‘मॅन टायगर’ : माणसातल्या हिंस्र श्वापदाची शोकात्म कहाणी
या कादंबरीचा बाज जरी सस्पेन्स-थ्रिलरचा असला तरी वाघासारख्या हिंस्त्र श्वापदाची प्रतिमा ही कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. कादंबरीतील विविध प्रतिमांतून, दृश्यांतून वाचकाला मानवी क्रौर्याचं आणि हिंसेचं दर्शन घडत राहतं. त्यामुळे मानवाच्या आदिम जाणिवांची लेखक सामाजिक आणि कौटुंबिक अंगानं चिकित्सा करू पाहतोय हे सुस्पष्ट आहे. अशी ही काहीशी जादुई वास्तववादी, आभास आणि वास्तव यांच्या सीमेवर रेंगाळणारी कादंबरी.......